Maharashtra

भोकरदन येथे नाताळनिमित्त राज्यस्तरीय ‘कलाभूषण पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न*

*भोकरदन येथे नाताळनिमित्त राज्यस्तरीय ‘कलाभूषण पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न*

भोकरदन (श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी जि. जालना) येथे नाताळनिमित्त दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती व महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन पिसे कॉम्प्लेक्स, भोकरदन येथील संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार संघाचे अध्यक्ष महादूजी सुरडकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कामगार संघाचे राज्य सल्लागार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एफ. एच. सिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष महादूजी सुरडकर यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात
इंदुबाई हरी मळेकर, कस्तुराबाई सिताराम कोथळकर, सुशिलाबाई हिरालाल कोथळकर, लक्ष्मीबाई अंकुश मस्के व नंदाबाई रामदास वाघ
यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास शाहीर डॉ. साहेबराव ठोंबरे, ॲड. एफ. एच. सिरसाठ, बाबुराव कांबळे, विष्णू गोफणे, साहेबराव शिंदे, सुरेखा पगारे यांच्यासह अनेक मान्यवर व उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button