भोसरी प्रभाग ५ मध्ये महेशदादांचे राजकीय गणित अचूक; पॉवरफुल पॅनल देत खेळीमेळीचा मास्टर स्ट्रोक

भोसरी प्रभाग ५ मध्ये महेशदादांचे राजकीय गणित अचूक; पॉवरफुल पॅनल देत खेळीमेळीचा मास्टर स्ट्रोक
भोसरी प्रभाग क्रमांक ५ मध्ये आमदार महेशदादा लांडगे यांनी अत्यंत अचूक राजकीय गणित मांडत पॉवरफुल पॅनल जाहीर करून निवडणूक रणनितीतील मास्टर स्ट्रोक दिला आहे. अनुभव, जनसंपर्क आणि विरोधकांची मोट बांधण्याची खेळी या माध्यमातून महेशदादांनी प्रभागातील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवली असल्याचे चित्र दिसत आहे.
महेशदादांचे खंदे समर्थक तसेच भाजपचे माजी नगरसेवक सागर गवळी यांनी मागील कार्यकाळात केलेली विकासकामे, नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि जनसामान्यांचा विश्वास लक्षात घेता, पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि कामाचा अनुभव या जोरावर सागर गवळी यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
तसेच कविता भोंगाळे पाटील यांनी मागील निवडणुकीत उमेदवारीसाठी तयारी केली होती, मात्र नशिबाने साथ न दिल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र सातत्याने नागरिकांशी असलेला संपर्क, जनसेवेतून आमदारांशी असलेली निष्ठा आणि उद्योजक विनायक भोंगाळे यांची कन्या म्हणून मिळालेला सामाजिक वारसा याच्या बळावर यावेळी कविता भोंगाळे पाटील आपले नशीब आजमावत आहेत.
या पॅनलमधील सर्वात महत्त्वाची राजकीय खेळी म्हणजे विरोधकांची मोट बांधण्यात आमदार महेशदादांना मिळालेले यश. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका अनुराधा गोफणे यांना भाजपमध्ये प्रवेश देत पुन्हा उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनाही भाजपमध्ये सामावून घेत प्रभाग ५ मध्ये संपूर्ण ताकदीने पॅनल निवडून आणण्याची व्यूहरचना करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते.
एकूणच भोसरी प्रभाग ५ मध्ये अनुभव, विश्वास आणि विरोधकांना सामावून घेण्याची रणनीती यांचा समतोल साधत आमदार महेशदादांनी निवडणूक लढतीपूर्वीच आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रतिनिधी -विजय अडसूळ

