Maharashtra

कोंढवा–येवलेवाडीतील धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलांना विद्युत खांबावर चढवून काम

कोंढवा–येवलेवाडीतील धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलांना विद्युत खांबावर चढवून काम

 

पुणे | प्रतिनिधी
कोंढवा–येवलेवाडी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलांना थेट विद्युत खांबावर चढवून लाईट व वायरिंगचे धोकादायक काम करून घेतले जात असल्याचे फोटो व व्हिडिओ पुराव्यांमधून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लहर उसळली आहे.मुलांच्या हातात सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा रबर ग्लोव्हजसारखी कोणतीही सुरक्षा साधने नसताना त्यांना उंच विद्युत खांबावर चढवले गेले. जिवंत तारांजवळ असे काम करवणे म्हणजे मुलांच्या जीवाशी खेळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून,बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमाचा थेट भंग,विद्युत सुरक्षा नियमांचे स्पष्ट उल्लंघन,मानवी हक्कांचा गंभीर अपमान असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सदर काम महावितरणच्या अखत्यारीतील असून ठेकेदारामार्फत चालू आहे. यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर संगनमताचा गंभीर आरोप होत आहे. नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली असून, पोलिस व श्रम विभागाकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button