Maharashtra

हिंदू महासभेकडून नितीन शुक्ल यांची वॉर्ड क्रमांक ३४ मधून उमेदवारी जाहीर

हिंदू महासभेकडून नितीन शुक्ल यांची वॉर्ड क्रमांक ३४ मधून उमेदवारी जाहीर

पुणे | प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभेकडून वॉर्ड क्रमांक ३४ मधून नितीन शुक्ल यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
नितीन शुक्ल हे पेशाने इंजिनियर असून ते एक यशस्वी व नामांकित बांधकाम व्यवसायिक आहेत. उद्योग क्षेत्रातील अनुभवासोबतच त्यांनी सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला असून नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
यावेळी हिंदू महासभेच्या नेतृत्वाने सांगितले की, स्वच्छ व पारदर्शक प्रशासन, नागरिकांचे मूलभूत प्रश्न, स्थानिक विकास आणि हिंदुत्वाची मूल्ये या मुद्द्यांवर पक्ष आगामी निवडणूक लढवणार आहे. नितीन शुक्ल यांचा शैक्षणिक व व्यावसायिक अनुभव वॉर्डच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
हिंदू महासभा ही ११० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला पक्ष असून यापूर्वी पुणे महानगरपालिकेत महापौरपद भूषवलेला पक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीने उतरल्याचे चित्र आहे.
उमेदवारी स्वीकारताना नितीन शुक्ल यांनी नागरिकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button