जत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार परिसरात तरुणाचा निर्घृण खून*
दिनांक.२०/१२/२०२५.
*जत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार परिसरात तरुणाचा निर्घृण खून*
जत शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे.उमदी ( ता.जत ) येथील विकास मलकरी टकले ( वय २४ ) या तरुणाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह संपूर्ण नग्नावस्थेत शुक्रवारी पहाटे आढळून आला.
घटनास्थळी पाहणी केली असता मृताच्या तोंडावर तसेच डोक्याच्या मागील भागावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळून आले यावरून खून अत्यंत अमानुष पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.निर्जन ठिकाणी मृतदेह टाकून आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या प्रयत्नात मृत तरुण हा उमदी येथील घुगे वस्ती वरील विकास मलकरी टकले असल्याचे निष्पन्न झाले.
सदर खून जमिनीच्या जुन्या वादातून भावकीतील लोकांनीच विकासचा खून केल्याचा संशय मृत तरुणांच्या नातेवाईक आई व बहिणीने व्यक्त केला आहे.नातेवाईकांच्या जबाबावरून पोलिसांनी तपास दिशा निश्चित करण्यास सुरुवात केली असून संबंधित भावकीची चौकशी केली जात आहे.
प्रतिनिधी :- संजय कोळी.सांगली



