Maharashtra
शरद पवारांना भारतरत्न देण्याची निलेश लंके यांची जोरदार मागणी
मुंबई, १३ डिसेंबर २०२५ | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची जोरदार मागणी केली आहे. शरद पवार यांच्या कार्यकाळात ७२ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी राबविण्यात आल्याचे नमूद करत, लंके यांनी पवार यांच्या शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासातील भरीव योगदान अधोरेखित केले.
मुंबईत बोलताना लंके म्हणाले, “शरद पवार हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे गौरव आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अशा नेत्याला भारतरत्न देणे हे देशाचे सौभाग्य ठरेल.”
या मागणीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, राज्याच्या राजकारणात यावर चर्चा रंगू लागली आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे

