नाशिक तपोवनमध्ये हिंदू महासभेचे झाडतोडीविरोधात आंदोलन

नाशिक तपोवनमध्ये हिंदू महासभेचे झाडतोडीविरोधात आंदोलन
नाशिक, ११ डिसेंबर –
हिंदू महासभेच्या वतीने नाशिकच्या तपोवन परिसरात काल झाडतोडीच्या विरोधात झाडे लाऊन जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी “झाडे लावा – सरकारची जिरवा”, “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणा देत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन झाडे तोडण्याचा प्रयत्न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला.प्रशासनाने अन्य पर्याय आहेत तेथे व्यवस्था करावी झाडे तोडलेले साधूनाही पटणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच MICE प्रकल्पासाठी २.२० कोटींचे टेंडर कोणत्या निकषांवर काढण्यात आले? याबाबतही हिंदू महासभेने गंभीर प्रश्न उपस्थित केले.
या आंदोलनात महासभेचे आनंद दवे,मनोज तारे,नितीन शुक्ल,उमेश कुलकर्णी ,अॅड पंकज चौहान,मनिष गोसावी, कौस्तुभ जाखडी बापु दापसे व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
