Uncategorized

मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला; आमदार महेश लांडगे यांचा सभागृहात संतप्त सवाल सर्व मोकाट कुत्री प्राणीमित्रांच्या घरी नेऊन सोडा.

 

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद चिंताजनकरीत्या वाढला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या एका वर्षात तब्बल ८ हजारांहून अधिक नागरिकांवर तर पुणे परिसरात मागील तीन वर्षांत १ लाखांपेक्षा जास्त नागरिकांवर कुत्र्यांच्या हल्ल्यांची नोंद झाली आहे.

या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत माननीय आमदार महेश दादा लांडगे यांनी विधानसभेत थेट सवाल उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अद्याप ठोस आणि प्रभावी उपाययोजना न झाल्याची त्यांनी जोरदार टीका केली.

मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली की काही प्राणीमित्र संघटना आक्षेप घेतात, आंदोलने करतात, परंतु जखमी नागरिकांच्या वेदनांकडे कोण लक्ष देणार? असा थेट प्रश्न लांडगे यांनी सभागृहात उपस्थित केला.

सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही राज्य शासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून, सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने कठोर धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी त्यांनी संतप्त शब्दांत इशारा दिला—

“नाहीतर सर्व मोकाट कुत्री प्राणीमित्रांच्या घरी नेऊन सोडा… कारण नागरिकांची सुरक्षा सर्वांत प्रथम

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button