Maharashtra
पुणे–बेंगळुरू महामार्गावर तेल सांडल्यामुळे वाहतूक विस्कळीत; दुचाकी घसरल्याच्या घटना

पुणे–बेंगळुरू महामार्गावर तेल सांडल्यामुळे वाहतूक विस्कळीत; दुचाकी घसरल्याच्या घटना
पुणे : मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील बावधन ते कोथरूडदरम्यान रस्त्यावर तेल सांडल्यामुळे आज सायंकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून किरकोळ जखमी झाले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
घटनास्थळी वाहतूक पोलीस तातडीने दाखल झाले असून रस्त्यावर माती व वाळू टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी नागरिकांना या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगण्याचे, वेग कमी ठेवण्याचे तसेच अचानक ब्रेक व लेन बदल टाळण्याचे आवाहन केले आहे. शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्यासही सांगितले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
