सेवा विकास बँकेत मोठी दिलासादायक उलथापालथ; २०५ कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन जमा होण्यास सुरुवात.
पिंपरी (प्रतिनिधी):- सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक पिंपरीमध्ये कोणतीही शासकीय किंवा कामगार विभागाची पूर्वपरवानगी न घेता सुमारे २०५ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना लिक्विडेटर यांनी कामावरून कमी केले होते. या अन्यायाविरोधात गेली अनेक वर्षे संघर्ष सुरू असताना अखेर कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष आणि कामगार नेते यशवंत भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व मध्यस्थीनंतर बँकेत मोठी उलथापालथ झाली असून, तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहे.
लिक्विडेटर कार्यालयामार्फत वेतनश्रेणीनुसार १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंतची रक्कम अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती कामगारांकडून मिळाली. या घडामोडीची पुष्टी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
दीर्घकाळ वेतनापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कामगारांच्या न्यायासाठी केलेला हा निर्णायक विजय असल्याचेही भोसले यांनी नमूद केले.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे