पिंपळे सौदागरमध्ये ‘सहकार दरबार’ : गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून उपाय
पिंपळे सौदागरमध्ये ‘सहकार दरबार’ : गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून उपाय
पिंपळे सौदागर : पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण सोसायट्या व अपार्टमेंट्स फेडरेशनतर्फे रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी ‘सहकार दरबार’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पिंपळे सौदागर येथील गणेश रेसिडेन्सी, लोटस हॉस्पिटलजवळ, शिवसाई लेन येथे होणार आहे.
को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या व अपार्टमेंट्सना येणाऱ्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन व उपाययोजना या दरबारात सविस्तर दिल्या जाणार आहेत. फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक तसेच वरिष्ठ अधिवक्ता कनाड लहाने या कार्यक्रमात उपस्थित राहून सोसायट्यांवर येणारे तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय मुद्दे स्पष्ट करतील.
सोसायट्यांचे प्रश्न एकाच व्यासपीठावर मांडून त्यावर त्वरित उपाय मिळावेत हा ‘सहकार दरबार’चा मुख्य उद्देश असल्याची माहिती सहकार मित्र (पीसीएमसी) अभिजित कुलकर्णी यांनी दिली. तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
