मालेगावमध्ये संतापाचा भडका : चिमुकलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी मुंबई–आग्रा महामार्ग रोखला
मालेगावमध्ये संतापाचा भडका : चिमुकलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी मुंबई–आग्रा महामार्ग रोखला
दिनांक : 27 नोव्हेंबर 2025, मालेगाव (नाशिक)
डोंगराळे परिसरातील चिमुकलीवर झालेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर संतप्त झाला आहे. या घटनेविरोधात ग्रामस्थांचा रोष ओसंडून वाहत आज संतापलेल्या नागरिकांनी मुंबई–आग्रा महामार्ग रोखत जोरदार आंदोलन केले. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनाचा ताण वाढू नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. महामार्ग अडवणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी, पुणे


