महिलांवरील अत्याचारांविरोधात दुर्गा ब्रिगेडचे उपोषण; तात्काळ कारवाईची मागणी.
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बालिका व महिलांवरील अत्याचारांविरोधात ठिय्या उपोषण करण्यात आले. संघटनेच्या संस्थापिका दुर्गा भोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना दुर्गा भोर म्हणाल्या, “संविधानदिनी महिलांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शासनाने शक्ती कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी; अन्यथा आरोपींना त्वरित फाशी न दिल्यास मंत्रालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात येईल.”
दुर्गा ब्रिगेडतर्फे मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
शक्ती कायद्याची तात्काळ अंमलबजावणी मालेगाव प्रकरणातील आरोपीस फास्टट्रॅक कोर्टामार्फत त्वरित फाशी
कायदा-सुव्यवस्था सुधारून महिला सुरक्षिततेस प्राधान्य
उपोषण सोडविण्याची भूमिका संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार आणि हवालदार कोमल गरड यांनी बजावली. त्यांच्या हस्ते दुर्गा भोर यांचे उपोषण समाप्त झाले.
कार्यक्रमाला माजी नगरसेविका सुलभा उबाळे, वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, प्राजक्ता पांढरकर, यशवंत भोसले, निलेश मुटके, दत्ता भांडेकर, अझीज शेख, बाळासाहेब भागवत, दिलीप पांढरकर, अभय भोर, दीनानाथ जोशी, शरद टेमगिरे, धम्मराज साळवे, राजाभाऊ सरोदे, प्रल्हाद कांबळे, रामभाऊ दरवडे, वैभव जगताप, गणेश भांडवलकर, वैजनाथ शिरसाट, सचिन पवार, शुभम यादव, बी. आर. माडगूळकर, सविता शेंडगे, लक्ष्मीनाथ टिळक, संगीता विद्यागज, सुजाता काळे, नीता पांचाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केले.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे