Uncategorized
मुंबई महापालिका निवडणूक २०२६ : काँग्रेसकडून उमेदवारी अर्जांची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ
मुंबई महापालिका निवडणूक २०२६ : काँग्रेसकडून उमेदवारी अर्जांची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. २४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख आता ३० नोव्हेंबर २०२५ करण्यात आली असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.
उमेदवारांचे अर्ज मुंबई काँग्रेस कार्यालय, राजीव गांधी भवन येथे २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत.
🖊️ प्रतिनिधी : सिंतिया कोरिया | मुंबई