नेवासा नगरपंचायत निवडणूक प्रचाराला जोर – खासदार डॉ. सुजय दादा विखे-पाटील आज नेवासात.

नेवासा प्रतिनिधी: नेवासा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांच्या प्रचार मोहिमेला वेग देण्यासाठी खासदार डॉ. सुजय दादा विखे-पाटील आज नेवासा शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे महायुतीच्या प्रचाराला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुपारी शहरातील मुख्य चौकातून भव्य प्रचार रॅलीला सुरुवात होणार असून रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरफटका मारत नागरिकांशी थेट संवाद साधेल. रॅलीत महायुतीचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने शहरात निवडणूक उत्साहाची लाट उसळली आहे.
रॅलीनंतर आयोजित सभेत खासदार डॉ. सुजय दादा विखे-पाटील महायुतीची विकासाभिमुख भूमिका, स्थानिक प्रश्नांवरील उपाययोजना आणि नगरपंचायतीच्या भावी नियोजनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन ते करणार आहेत.
प्रतिनिधी : अस्मिता मीडिया.