मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ आणि ‘ईशा नेत्रालय’ तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर
मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ आणि ‘ईशा नेत्रालय’ तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर

📅 दि. 11 नोव्हेंबर 2025 | चिंचवड
मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने वुई टुगेदर फाउंडेशन आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर ईशा नेत्रालय हॉस्पिटल, चिंचवड येथे आयोजित करण्यात आले.
या शिबिरात १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉक्टरांकडून जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक मशिनद्वारे नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच सर्जन डॉ. वैभव अवताडे (रेटिना व मोतीबिंदू स्पेशालिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांचे आजार आणि वर्षातून एकदा नेत्र तपासणी का आवश्यक आहे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी उपस्थित रुग्णांच्या शंकांचे निरसनही केले.
शहरातील नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हॉस्पिटल मार्केटिंग हेड आणि वर्क कोऑर्डिनेटर गणेश कांबळे यांनी नागरिकांना हॉस्पिटलविषयी सविस्तर माहिती दिली.
या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वुई टुगेदर फाउंडेशन चे अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, तसेच रवींद्र सागडे, सलीम सय्यद, रवींद्र काळे, अर्जुन पाटोळे, सुरेंद्र जगताप, सदाशिव गुरव, रोहिणी बच्चे, वासंती काळे, दिलीप दानी, विलास गटने आदी पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
शिबिरात डॉ. वैभव अवताडे (रेटिना, मोतीबिंदू), डॉ. जयशील नाझरे (मोतीबिंदू, काचबिंदू, लहान मुलांचे नेत्रतज्ज्ञ व रिफ्रॅक्टिव सर्जन), गणेश कांबळे (मार्केटिंग हेड), दुर्वाक्षी (ॲडमिन) आणि शिवानी शिंदे (फ्लोअर मॅनेजर) यांनी नागरिकांना सेवा देत महत्त्वाची भूमिका बजावली.
✍️ प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी, पुणे
