अजित पवार गटात मोठा निर्णय: रूपाली पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवले
अजित पवार गटात मोठा निर्णय: रूपाली पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्तेपदावरून हटवले
रूपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेशानुसार प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाच्या अंतर्गत नेत्यांवर तसेच पक्षाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती, ज्यामुळे पक्षाला अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच अमोल मिटकरी सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षात तणाव निर्माण करत असल्याने त्यांनाही पदावरून वगळण्यात आले आहे. या निर्णयानंतर पक्षाने नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून त्या यादीत रूपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांचा समावेश नाही.सूरज चव्हाण यांना प्रवक्तेपद पुन्हा दिले गेले आहे, हा निर्णय पक्षातील शिस्तभंग आणि वादग्रस्त विधानांमुळे घेतला असल्याचे सांगितले जात आहे�
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
