चिंचवड विधानसभेतील दिनकर मिश्रा यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या हिंदीभाषी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
📰 चिंचवड विधानसभेतील दिनकर मिश्रा यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या हिंदीभाषी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

चिंचवड :
चिंचवड विधानसभा क्षेत्रातील भाजप चे पंचायत राज विभागाचे अध्यक्ष दिनकर मिश्रा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या हिंदीभाषी सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पक्षाचे प्रदेश महासचिव श्री. परशनाथ तिवारी यांच्या हस्ते करण्यात आली. तिवारी यांनी मिश्रा यांना नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर दिनकर मिश्रा यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. हिंदीभाषी समाजाच्या प्रश्नांवर पक्षाचे बळ वाढवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करीन
या नियुक्तीबद्दल चिंचवड आणि परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या हिंदीभाषी सेलला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे (9822548429)
