माथेरानची राणी पुन्हा धावणार! येत्या १ नोव्हेंबरपासून माथेरान-नेरळ मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू
माथेरानची राणी पुन्हा धावणार! येत्या १ नोव्हेंबरपासून माथेरान-नेरळ मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू
पर्यटकांना आकर्षण ठरलेल्या माथेरान-नेरळ मिनी ट्रेन सेवेचा शुभारंभ येत्या १ नोव्हेंबरपासून होणार आहे. पावसाळ्यामुळे निलंबित करण्यात आलेली ही सेवा पर्यटकांसाठी मोठी आनंद वार्ता ठरणार आहे. या मिनी ट्रेनच्या पुन्हा सुरूवामुळे माथेरानमधील पर्यटन चालक वर्ग आणि हॉटेल व्यवसायीकांना दिलासा मिळणार आहे.मिनी ट्रेनची सेवा प्रामुख्याने जून महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली जाते. आता पावसाळा संपल्याने, दिवाळी आणि दसऱ्याच्या सुट्ट्यांचा विचार करून भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबरपासून हे मिनी ट्रेन फेर्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.निसर्गरम्य घाटात वळणावळणाच्या मार्गावरून प्रवास करताना पर्यटकांना अनोखा अनुभव मिळतो. त्यामुळे या मिनी ट्रेनच्या प्रत्येक फेरीची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. माथेरानमध्ये पर्यटन हंगामाला प्रोत्साहन मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे�l
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

