माहिती अधिकार संघटनेच्या वतीने सफाई कामगारांची ‘प्रकाश दिवाळी’ घंटागाडी सफाई कामगारांना आकाशकंदील वाटप — समाजासाठी उजळला दिवाळीचा प्रकाश.


माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव यांनी सांगितले की, “सफाई कर्मचारी हे खऱ्या अर्थाने शहराचे स्वच्छता दूत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महाराष्ट्रभर माहिती अधिकार कायद्याचा प्रचार-प्रसार करून नागरिकांना पारदर्शक शासनाचा अधिकार समजावून सांगत आहोत. अन्यायाविरुद्ध माहिती अधिकार हा एक प्रभावी हत्यार आहे, आणि आम्ही त्याचा सकारात्मक वापर करत आहोत.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध व्याख्याते व निवेदक राजाराम सावंत यांनी केले. त्यांनी सांगितले की, “पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश आहे. जागृत नागरी महासंघाने या कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाचा दीप लावला आहे.”
या वेळी क क्षेत्रीय कार्यालय प्रशासन अधिकारी सुनिता वायकर, सुपरवायझर श्याम शिरसाट, तसेच अनेक सफाई कामगार व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. सफाई कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आयोजकांना समाधान मिळाले.
अध्यक्ष नितीन यादव यांनी क क्षेत्रीय अधिकारी श्री. अजिंक्य येळे साहेबांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला जागृत नागरी महासंघाचे मावळ समिती अध्यक्ष दत्तात्रय काजळे, मच्छिंद्र गुजर, सुनील गुजर, शहर प्रमुख अशोक कोकणे, सचिव राजू डोगीवाल, खजिनदार रोहिणी यादव, श्रीनिवास कुलकर्णी, अरविंद पांचाळ, सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, ओंकार भागवत, राजेंद्र कदम, राजश्री शिर्के, रघुनाथ हांडे, दीपक नाईक, प्रकाश गडवे, सुनील साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी पाहायला मिळाली आणि “प्रकाश दिवाळी”ला खऱ्या अर्थाने मानवी संवेदनेचा प्रकाश लाभला. 🌟
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी पुणे
