शेतकऱ्यांना दिला नवा दिलासा: युवा मराठी उद्योजक प्रा. अनिल घोलप यांच्या ‘पसायदान ॲग्रो’ची यशोगाथा!
अहिल्यानगर (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने नेवासा तालुक्यातील पुनतगावचे युवा मराठी उद्योजक प्रा. अनिल घोलप यांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. ‘शेतकरी ते डायरेक्ट मार्केट’ या संकल्पनेवर आधारित त्यांचा पसायदान ॲग्रो हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा ठरत आहे.
उद्योग क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना, ग्रामीण मातीतून उभा राहिलेला हा युवक आज अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने अनेक शेतकरी तोटा सहन करत असताना, प्रा. घोलप यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यांना योग्य दर आणि वेळेवर पैसे देण्याचा उपक्रम सुरू केला.
या प्रवासात त्यांना सुरुवातीला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अनुभव नसल्याने अनेक अडचणी आल्या. परंतु, एक्सपोर्ट-इम्पोर्ट ट्रेनिंग घेऊन आणि दुबई दौऱ्याद्वारे तेथील बाजारपेठेची रचना समजून घेत, त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला.
या उपक्रमाला ‘गो फॉर्मली’ आणि ‘समर्थ क्रॉप केअर’ या प्रतिष्ठित कंपन्यांची मजबूत साथ मिळाली आहे. या कंपन्यांनी अनिल घोलप यांना आर्थिक मदत, तांत्रिक मार्गदर्शन आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवून त्यांचा ‘पसायदान ॲग्रो’ व्यवसाय अधिक बळकट केला आहे.
त्यांच्या थेट खरेदी मॉडेलमुळे अनेक शेतकऱ्यांना स्थैर्य मिळाले आहे. बाजारातील चढ-उतारातही शेतकऱ्यांना योग्य दर मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करत आहेत.
प्रा. अनिल घोलप यांच्या या यशस्वी संकल्पनेला इतर राज्यांतूनही प्रतिसाद मिळू लागला आहे आणि ‘पसायदान ॲग्रो’चा विस्तार आता राष्ट्रीय पातळीवर होत आहे.
“शेती केवळ व्यवसाय नाही, ती एक जबाबदारी आहे,” असं मत प्रा. अनिल घोलप यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या विचाराने आज अनेक तरुण उद्योजक आणि शेतकरी प्रेरित होत आहेत.
प्रतिनिधी : अस्मिता मीडिया
