माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डीले यांचे निधन राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले.

अहमदनगर, दि. १७ (प्रतिनिधी) :
माजी राज्यमंत्री, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तसेच राहुरी–नगर–पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्हा तसेच राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.
शिवाजीराव कर्डीले हे जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय, सर्वसामान्यांशी निगडीत राहणारे नेते म्हणून ओळखले जात. राजकारणात त्यांनी नेहमीच सर्व पक्षीय नेत्यांशी सलोखा ठेवत विकासाला प्राधान्य दिले. राहुरी–नगर–पाथर्डी मतदारसंघात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे राबवली होती.
त्यांच्या अकाली निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कर्डीले कुटुंबियांवर ओढवलेल्या या दुःखातून सावरण्याची शक्ती देव त्यांना देवो, अशी प्रार्थना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
प्रतिनिधी : शाम शिरसाठ