भानसहिवरा जिल्हा परिषद गटासाठी अॅड. संभाजी पवार – तरुण, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख चेहरा!

प्रतिनिधी: नेवासा तालुक्यातील भानसहिवरा जिल्हा परिषद गटात अॅडव्होकेट संभाजी पवार यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आदेश मानणारे, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी सुसंवाद व मैत्रीचे संबंध जपणारे ते एक प्रामाणिक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
भानसहिवरा गटातील प्रत्येक गावात — पाचेगाव, भानसहिवरा, माळीचिंचोरा, ऊस्थळ, पुनतगाव, नेवासा बु, निंभारी, गोणेगाव, इमामपूर, खुपटी, साईनाथनगर, लेकुरवाळी आखाडा, गोमळवाडी, चिंचबन — येथे त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि हितचिंतक कार्यरत असून, त्यांच्या बळावर अॅड. संभाजी पवार विजयी होतील, अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.
अॅड. पवार यांनी नेवासा शहरात भव्य कृषी व औद्योगिक प्रदर्शन भरवून आपली कार्यकुशलता दाखवून दिली. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन, फवारणी ड्रोनची माहिती, तसेच युवकांना उद्योग क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा मिळाली. या उपक्रमातून काही युवकांनी पत्रावळी मशीन उद्योग सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग धरला आहे.
नेवासा तालुक्यात क्रीडा संकुल उभारणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० एकरांवर भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा संकल्प साकार होणार असून, यासाठी तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
अॅडव्होकेट संभाजी पवार हे समाजसेवा, विकासकार्य आणि युवकांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर आहेत. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना संधी मिळावी, अशी मागणी आणि चर्चा सर्वत्र होत आहे.
प्रतिनिधी : शाम शिरसाट