Maharashtra

पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी पिंपरी चिंचवडची रणरागिनी मदतीला!

पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी पिंपरी चिंचवडची रणरागिनी मदतीला!
माढा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी कविता भोंगाळे-पाटील यांच्याकडून मदतीचा हात
माढा तालुक्यात अलीकडेच आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पिंपरी-चिंचवड जिल्हा चिटणीस कविता भोंगाळे-पाटील यांनी पुढाकार घेत संसार उपयोगी साहित्याचे वाटप केले.
उपक्रमांतर्गत माढा तालुक्यातील कुंभेज, केवड, खैराव आणि उंदरगाव येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य, चादरी, कपडे, शालेय साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संबंधित गावांच्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमात बोलताना कविता भोंगाळे-पाटील म्हणाल्या, “आपत्तीच्या काळात समाजातील प्रत्येकाने एकमेकांना आधार देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांना मानसिक आणि भौतिक बळ मिळते.”

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विदर्भ मित्र मंडळ, भोसरी यांच्या वतीने ५१ हजार रुपये किमतीचे शंभर धान्य किट पूरग्रस्तांना वाटपासाठी देण्यात आले. यासोबतच भाजपा पदाधिकारी, महिला बचत गट आणि प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांनी सढळ हाताने जीवनावश्यक वस्तू, धान्य आणि शालेय साहित्य प्रदान केले. कविता भोंगाळे- कडू पाटील यांनी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमावेळी विदर्भ मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सभासद तसेच संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांनी आयोजकांचे तसेच आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य आणि माणुसकीचा संदेश पसरतो, असे मत व्यक्त केले.

यावेळी कुंभोज ग्रामपंचायतचे मदन अलदर (उपसरपंच), धूळा दादा भिसे (पोलिस पाटील), नवनाथ नागटिळक, रमेश सरवदे, संजय हरदडे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, खैराव, माढा (सोलापूर) सरपंच जानकाबाई म्हस्के, उपसरपंच पंडित वसंतराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर नागटिळक, प्रतापराव पाटील, प्रशांत नागटिळक केवड ग्रामपंचायतचे उपस्थित सदस्य राजेंद्र पाटील (सरपंच), प्रशांत लटके तसेच उंदरगाव ग्रामपंचायतचे उपस्थित सदस्य सरपंच राजाभाऊ लवटे, अतुल म्हस्के, मगन नाईकवाडे, रामचंद्र थोरात, सतीश आरे, किरण लवटे, आदित्य लावते, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी -विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button