Maharashtra
मनाचे श्लोक’ चित्रपटाचे राज्यभरातील प्रदर्शन तात्पुरते स्थगित; नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित होणारमनाचे
मनाचे श्लोक’ चित्रपटाचे राज्यभरातील प्रदर्शन तात्पुरते स्थगित; नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित होणार
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुर्दैवी घटनेनंतर ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे महाराष्ट्रातील सर्व थिएटरमधील शो तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. चित्रपट टीमने प्रेक्षकांप्रती दुःख व्यक्त केले असून, त्यांनी सर्वांचे सहकार्य मागितले आहे.
चित्रपटाच्या मूळ नावाला काही हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर, निर्माते व टीमने निर्णय घेतला की १६ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) पासून हा चित्रपट नवीन नावासह पुन्हा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रेक्षकांनी चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेस किंवा थिएटरशी संपर्क साधावा.
प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी, पुणे