Uncategorized
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथे बदली
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथे बदली
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची आज नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
शेखर सिंह यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पिंपरी महापालिकेत आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी महापालिकेत एकूण तीन वर्ष आणि दोन महिने कामकाज केले.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदाचा तात्पुरता कार्यभार पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
प्रतिनिधी :- विजय अडसूळ
