महापालिकेच्या दुर्लक्षामुळे 1.2 कोटींच्या तीन ड्रेनेज साफसफाई रोबोट मशीन धुळखात
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे 1.2 कोटींच्या तीन ड्रेनेज साफसफाई रोबोट मशीन धुळखात

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 1.2 कोटी रुपयांच्या तीन ड्रेनेज साफसफाई रोबोट मशीन गेल्या सहा महिन्यापासून वापरात न आणता धुळखात पडून आहेत.
या आधुनिक मशीनचा उपयोग मुख्यत्वे अरुंद गल्लीबोळातील ड्रेनेज लाईन्स स्वच्छ करण्यासाठी होतो, जिथे मोठ्या गाड्या किंवा यंत्रणा पोहोचू शकत नाहीत. या रोबोटिक मशीनच्या खरेदीसाठी महापालिकेने या मशीन साठी 1.2 कोटी रुपये खर्च केले, तसेच त्यांच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी ही खर्च करावा लागतो
तथापि, ही तीनही मशीन १० मे २०२२ रोजी महापालिकेच्या मलनिःसारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत सध्या ह्या तीन पैकी दोन मशीन सध्या ह्या 3 पैकी 2 मशीन श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान, पुणे ह्या ठिकाणी अडगळीत पडून आहेत.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या दुर्लक्षा विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, महापालिकेने तातडीने या मशीनची तपासणी करून कार्यान्वित करावी, जेणेकरून शहरातील ड्रेनेज व्यवस्थेवरील ताण कमी होईल.
प्रशासनाकडून या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा योग्य वापर झाला नाही, तर सार्वजनिक निधी वाया जाईल आणि शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

