Maharashtra

शाहरुख खान-राणी मुखर्जी यांना राष्ट्रीय पुरस्कार; “जवान” आणि “मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे”साठी सन्मानित

User Rating: Be the first one !

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025 – 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचे ‘किंग खान’ शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

शाहरुख खान:
शाहरुख खानला “जवान” या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. त्यांच्या 33 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत हा पहिलाच राष्ट्रीय सन्मान आहे. शाहरुखने हा पुरस्कार विक्रांत मेस्सी सोबत शेअर केला, ज्याला 12वी फेल चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना शाहरुखने चाहत्यांचे, कुटुंबाचे आणि जवान टीमचे आभार मानले.

राणी मुखर्जी:
राणी मुखर्जीला “मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे” या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. संपूर्ण कारकिर्दीत हा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार ठरला.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button