मल्याळम सिनेसृष्टीचे महानायक मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मल्याळम सिनेसृष्टीचे महानायक मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांची करण्यात आली आहे. येत्या 23 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
मोहनलाल यांनी आपल्या ४५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि अष्टपैलू कारकीर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला असून मल्याळमसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही तेवढ्याच ताकदीने त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
यापूर्वी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण यांसारखे मान्यवर राष्ट्रीय पुरस्कार बहाल झाले आहेत. आता दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या योगदानाला सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.
पुरस्काराच्या स्वरूपात सुवर्णकमळ, शाल आणि १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. सोशल मिडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सिनेजगतातील मान्यवरांनी व चाहत्यांनी मोहनलाल यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
मोहनलाल हे हा सन्मान मिळवणारे दुसरे मल्याळम कलाकार ठरले आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


