डबल डेकर बस संदर्भात हिंदू महासभेचे PMPML अधिकाऱ्यांना निवेदन – अनेक प्रश्न अनुत्तरित

📰 डबल डेकर बस संदर्भात हिंदू महासभेचे PMPML अधिकाऱ्यांना निवेदन – अनेक प्रश्न अनुत्तरित
पुणे :
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) नुकत्याच डबल डेकर बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की –
डबल डेकर बस घेण्याची खरंच गरज काय आहे?
कोणत्या परीक्षणाच्या किंवा अहवालाच्या आधारे हा उद्योग सुचला?
खासगी वाहनांनी प्रवास करणारेच जास्त असलेल्या खराडी–IT पार्क मार्गावरच हा प्रयोग का?
PMPML खाते आधीच तोट्यात असताना हा अनावश्यक खर्च का करण्यात आला?
याच रकमेतून जुन्या बसेस दुरुस्ती करून नागरिकांना सुविधा देणे शक्य नव्हते का?
👉 हिंदू महासभेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, PMPML चे CE व पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत एकच उत्तर मिळाले – “नवीन बस खूप छान धावली”. मात्र हे उत्तर समाधानकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🚌 पूर्वीच्या डबल डेकर बस बंद का झाल्या?
याचीही आठवण करून देण्यात आली की पुण्यात याआधी डबल डेकर बसेस धावत होत्या; परंतु –
जास्त देखभाल खर्च,
अरुंद रस्ते, उड्डाणपूल व वीजतारा यामुळे सुरक्षेच्या अडचणी,
प्रवासी चढ-उतारास वेळ लागणे,
प्रवासी प्रतिसाद कमी,
आणि आर्थिक तोटा
या कारणांमुळे त्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या.
अशा परिस्थितीत पुन्हा त्याच बसेस घेण्यामागील हेतू संशयास्पद असल्याचे हिंदू महासभेच्या म्हणणे आहे
यावेळी हिंदू महासभेचे श्री आनंद दवे, मनोज तारे, सूर्यकांत कुंभार,नितीन शुक्ल, उमेश कुलकर्णी, तृप्ती ताई तारे आणि आदिती ताई जोशी उपस्थित होत्या
🔜 हिंदू महासभेचे पदाधिकारी उद्या PMPML च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार असून त्यात आणखी ठोस प्रश्न विचारले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


