मंगला डोळे-सपकाळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मंगला डोळे-सपकाळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त मंगला डोळे-सपकाळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष रवींद्र काळे, सेक्रेटरी अनिल गालिंदे, खजिनदार गजानन चिंचवडे, वुई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, वासंती काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
लायन्स क्लब चे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंगला डोळे-सपकाळे यांनी शिक्षण क्षेत्रातील संघर्षाचा तसेच वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा जपतानाचा प्रवास कथन केला. मामांनी संस्कारित संगोपन करून निःस्वार्थी कार्य करण्यासाठी दिलेले बळ, तसेच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे कार्य याबद्दल त्या भावुक झाल्या. आजवर अनेक पुरस्कारांनी गौरव झाले असून हा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांच्यासाठी मानाचा टप्पा ठरल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी लायन्स क्लबचे खजिनदार गजानन चिंचवडे यांनी आभार मानले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

