पोस्टमन आता फक्त आठवणीत – केसरी वाडा गणपती विसर्जनातील खास थीम

पोस्टमन आता फक्त आठवणीत – केसरी वाडा गणपती विसर्जनातील खास थीम📰

पुण्यातील प्रतिष्ठित केसरी वाडा मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा “पोस्टमन आता फक्त आठवणीत” ही आगळीवेगळी थीम साकारण्यात आली.
यामध्ये सर्व वादकांनी पारंपरिक पोस्टमनची वेशभूषा धारण केली होती. एकेकाळी पत्रे, मनीऑर्डर, आनंदवार्ता- दुःखवार्ता घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारा पोस्टमन आता केवळ आठवणीत उरलाय, हे या झांकीतून अधोरेखित करण्यात आले.
याचबरोबर, अलीकडेच अनेक ठिकाणी पोस्ट बॉक्स बंद करण्यात आले आहेत, याची जाणीव करून देत ही झांकी मांडण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रव्यवहार कमी झाला असला तरी पोस्टमनने एकेकाळी समाजजीवनात निभावलेली महत्त्वाची भूमिका नागरिकांना या उपक्रमातून आठवण करून देण्यात आली.
मोठ्या संख्येने नागरिकांनी या सामाजिक आशयाच्या झांकीचे कौतुक केले. केसरी वाढच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत या उपक्रमाने उत्सवाला वेगळा संदेश दिला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429



