Maharashtra
दिव्यांग शाळेत गणेश स्थापना जल्लोषात

दिव्यांग शाळेत गणेश स्थापना जल्लोषात
पिंपरी –
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेत गणेश स्थापना उत्साहात पार पडली. वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मधुकर बच्चे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.
या वेळी वुई टुगेदर फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे–सपकाळे, सलीम सय्यद, सल्लागार रवींद्र सांगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी वर्गासोबत त्यांनी संवाद साधला व त्यांच्या कला-कौशल्यांची माहिती घेतली.
अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसुडगे यांनी मान्यवरांचा सत्कार करत आभार मानले.
वुई टुगेदर फाउंडेशन विविध उपक्रमांतून अभिराज फाउंडेशनला सातत्याने सहकार्य करत असून या वेळीही दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत गणेशोत्सवाचा आनंद लुटला गेला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429