Maharashtra
पिंपरी-चिंचवडची श्रावणी टोणगे जर्मनीत धडकणार – तब्बल एक कोटींची स्कॉलरशिप
पिंपरी-चिंचवडची श्रावणी टोणगे जर्मनीत धडकणार – तब्बल एक कोटींची स्कॉलरशिप
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील श्रावणी टोणगे हिची जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) – रॉबर्ट बॉश महाविद्यालयात निवड झाली आहे. विशेष म्हणजे श्रावणीला तब्बल एक कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळाली असून, ही शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
या अभिमानास्पद यशाबद्दल नुकतेच महापालिका आयुक्त मा. शेखर सिंह यांनी भर पावसात श्रावणीच्या कासारवाडी येथील घरी भेट देऊन कौतुक केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
श्रावणीच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले असून, स्थानिक पातळीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429


