विरार इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, 9 जखमी

📰 विरार इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, 9 जखमी
शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर
विरार :
विरार येथे घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती आली आहे स्थानिक प्रशासन, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्य शासनाने या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
👉 “जखमींच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे प्रशासनाने आश्वासन दिले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
