गुरुपौर्णिमेनिमित्त ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुरुपौर्णिमेनिमित्त ब्राह्मण महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे, १२ जुलै: गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, १२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता, सिद्धार्थ हॉल, बडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, मानिकबाग, येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रख्यात वास्तुविशारद डॉ. नरेंद्र हरी सहस्रबुद्धे यांचे “वास्तू उपाय आणि शास्त्र” या विषयावर सखोल मार्गदर्शन. तसेच, कुलपती एम. आय. टी., पुणे येथील डॉ. मिलिंद पांडे यांचेही विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यात येणार असून, त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. यानिमित्ताने समाजातील पालक, विद्यार्थी आणि सर्व बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. संजय देशमुख – 📞 9763311094
अनीता जोशी – 📞 9923056574
अमित पेंढारकर– 📞 9922913169