Maharashtraउद्योग विश्व

व्यवसायिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे ठोस पाऊल 🟠

🟠 व्यवसायिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे ठोस पाऊल 🟠
पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे निवेदन; तात्काळ कारवाईचे आश्वासन

पुणे, दि. ९ जुलै २०२५
पुणे शहरातील व्यवसायिकांवर खंडणी, धमक्या, माथाडी कामगारांच्या जबरदस्ती यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची गंभीर बाब आज समोर आली आहे. सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागाने तत्काळ लक्ष घालून पोलीस सहआयुक्त मा. श्री. रंजन कुमार शर्मा यांची भेट घेतली आणि यासंदर्भात अधिकृत निवेदन सादर केले.

या भेटीत शहरातील सिंहगड रोड, स्वारगेट, लष्कर, वाघोली आदी भागांतील व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या. खंडणी, स्थानिक अडथळे, आणि माथाडी संदर्भातील जबरदस्ती यामुळे व्यवसाय धोक्यात येत असल्याचे प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले.

या गंभीर मुद्द्यांवर पोलीस सहआयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत “पोलीस प्रशासन व्यवसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. अशा घटनांवर तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल,” असे ठाम आश्वासन दिले. तसेच अशा प्रकारच्या त्रासासंदर्भात थेट संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी प्रतिनिधींना केले.

या शिष्टमंडळात खालील मान्यवर उपस्थित होते:

आदित्य सोळंकी

आशुतोष बगाडे

मनीष कोंडे

संजय बावळेकर

अभिषेक जोशी

या संदर्भात बोलताना चैतन्य जोशी, अध्यक्ष – महाराष्ट्र उद्योग विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणाले, “शहरातील प्रत्येक व्यवसायिक सुरक्षित राहिला पाहिजे, हे आमचे प्राधान्य आहे. खंडणी व जबरदस्ती सहन केली जाणार नाही. आम्ही व्यवसायिकांसोबत खंबीरपणे उभे आहोत.

आपल्या परिसरात जर अशा प्रकारच्या त्रासाचा सामना करत असाल, तर कृपया आम्हाला निःसंकोच संपर्क करा. असे आवाहन चैतन्य जोशी यांनी केले आहे

📞 संपर्क: चैतन्य जोशी – 88888 68887

प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button