ब्राह्मण महासंघ, पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि नवीन कार्यकारिणी जाहीर पिंपरी-चिंचवड, ३० जून २०२५:
ब्राह्मण महासंघ, पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि नवीन कार्यकारिणी जाहीर
पिंपरी-चिंचवड, ३० जून २०२५:
ब्राह्मण महासंघ, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी, २९ जून २०२५ रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चिंचवड येथील सिद्धी विनायक हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात शहरातील ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पालकांच्या योगदानालाही मान्यता देत त्यांचेही कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडच्या महिला आघाडी, पुरुष आघाडी आणि युवती आघाडीच्या नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी सौ. ललिता गोऱ्हे, शहर उपाध्यक्षपदी सौ. रेणुका कोडगुले, चिंचवड उपाध्यक्षपदी विशाखा पाठक , व दिपाली सोले, संपर्कप्रमुखपदी स्मिता बोरगावकर, विभाग प्रमुख (थेरगाव) म्हणून सुवर्णा दुराफे, मानसी बोकील वल्लभ नगर विभाग प्रमुख तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ऋचा गांगल, माधुरी पांडे आणि उषा जोशी यांची निवड झाली.
युवती आघाडीच्या अध्यक्षपदी कृतिका पाठक, थेरगाव विभाग प्रमुख भाग्यश्री गोरे, उपाध्यक्षपदी प्राची तागडे आणि संघटकपदी स्वप्नाली जोशी यांची निवड करण्यात आली. पुरुष आघाडीत सुधीर दुराफे (संपर्कप्रमुख पिंपरी चिंचवड ), अविनाश कुलकर्णी (विभाग प्रमुख, चिंचवड), सीए नितीश वैद्य, अनिकेत जोशी आणि आनंद याक्रस (पदाधिकारी सदस्य) यांची निवड झाली.
कार्यक्रमाचे स्वागत उमेश कुलकर्णी यांनी केले, तर प्रास्ताविक अनिता जोशी यांनी सादर केले. सूत्रसंचालन नितीन शुक्ल यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी ॲड. नीता जोशी, आनंद याक्रस सर, पुष्कर भातखंडे आणि संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित राहून प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमास चैतन्य जोशी (जिल्हाध्यक्ष), संजयजी देशमुख (सिंहगड विभाग अध्यक्ष), उदय कुलकर्णी (अध्यक्ष, उद्योग आघाडी), अविनाश कुलकर्णी, पुष्कर भातखंडे, अभिषेक कुलकर्णी, अरविंदजी कुलकर्णी, राजेशजी डावरे, संजय जोशी (उपाध्यक्ष, पीसीएमसी) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, ब्राह्मण महासंघाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला अधिक बळ मिळाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.