Maharashtra

“वुई टुगेदर फाउंडेशनचा आर्थिक सहय्यता निधी उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी ठरतोय आधारस्तंभ

“वुई टुगेदर फाउंडेशनचा आर्थिक सहय्यता निधी उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी ठरतोय आधारस्तंभ!”
दि. २२ जून २०२५ | स्थळ : चिंचवड

समाजात आजही अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हाच सामाजिक प्रश्न ओळखून वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.

या उपक्रमाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांकडे आई-वडील नाहीत, किंवा पालक असले तरी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, अशा विद्यार्थ्यांना निवडून त्यांना आर्थिक सहकार्य करण्यात आले. फाउंडेशनच्या या “आर्थिक सहय्यता निधी उपक्रमाची” सुरुवात चिंचवड येथील आनंदीबाई डोके सांस्कृतिक सभागृहात करण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा कॉलेजचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया उपस्थित होते. त्यांनी वुई टुगेदर फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक करत हा उपक्रम निःस्वार्थी सेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले.

फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी उपस्थितांचे स्वागत करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गुरुजन, पालक यांचा सन्मान करावा, तसेच समाजासाठी काही तरी देण्याचे भान कायम ठेवावे.”

संस्थापक क्रांतीकुमार कडुलकर यांनी फाउंडेशनची उद्दिष्टे व कार्याची माहिती दिली.
या उपक्रमास माजी नगरसेवक ह.भ.प. आप्पा बागल यांनी आर्थिक मदत केली असून ते स्वतःही कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही सहकार्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमात फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता:

मधुकर बच्चे (अध्यक्ष), क्रांतीकुमार कडुलकर (संस्थापक), सोनाली मन्हास (उपाध्यक्ष), रवींद्र (सल्लागार), दिलीप चक्रे (खजिनदार), दारासिंग मन्हास, सलीम सय्यद, प्रा. मेघना भोसले, विलास गटने, विलास जगताप, अरविंद पाटील, खुशाल दुसाने, परमानंद सोनी, धनराज गवळी, शंकर कुलकर्णी, मोहम्मद शेख, जाकीर सय्यद, मुकुंद इनामदार, जावेद शेख, अर्जुन पाटोळे, सुरेंद्र जगताप, रवींद्र इंगळे, रवींद्र शेटे, अभिजीत सागडे, हर्षदा सागडे, अनिल गोरे, धनंजय मांडके, वासंती काळे, प्रसाद कुलकर्णी, हनीफ सय्यद, अभिजीत कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, नंदकुमार वाडेकर, असावरी बच्चे, रकेशा जैन, श्रावणी बच्चे, यश डोळे, दत्तात्रय सातव, स्मिता बागल व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
सहसचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी सुमधुर आवाजात सामुदायिक पसायदान सादर केले.
धनंजय मांडके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

हा उपक्रम वुई टुगेदर फाउंडेशनच्या सामाजिक जाणीवेचा उत्कृष्ट नमुना ठरला असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून फाउंडेशन समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे 9822548429


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button