Maharashtra
सततच्या पावसामुळे ,चिंचवडमधील मोरया मंदिर जलमय
पिंपरी-चिंचवड – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिंचवड गावातील ऐतिहासिक मोरया गोसावी मंदिराचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, गाभाऱ्यापर्यंत पाणी शिरल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाविकांसाठी मंदिरात दर्शन बंद करण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पवना नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदीकाठी वसलेले चिंचवड गावातील हे प्रसिद्ध मंदिर पाण्याच्या प्रवाहाने वेढले गेले असून, मंदिराच्या कळसाला पाणी न लागले तरी खालचा भाग आणि सभामंडप संपूर्णतः जलमय झाला आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्या मंदिर परिसरात येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– प्रतिनिधी उमेश कुलकर्णी, पुणे