Uncategorized

इंद्रायणी नदी पूल दुर्घटना: प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष? – “फक्त फलक लावून जबाबदारी संपते का?”

इंद्रायणी नदी पूल दुर्घटना: प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष? – “फक्त फलक लावून जबाबदारी संपते का?”

तळेगाव दाभाडे (पुणे जिल्हा): तळेगाव दाभाडे नजीक कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 15 ते 20 हून अधिक नागरिक नदीत वाहून गेले असण्याची शक्यता आहे. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

धोकादायक पुलावर पूर्वसूचना — पण दुर्लक्ष?

या अपघाताचा सर्वात धक्कादायक आणि त्रासदायक भाग म्हणजे – या पुलावर आधीच धोक्याचा इशारा देण्यात आलेला होता.

स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेल्या फलकावर स्पष्टपणे लिहिले होते:

> “सदर साकव पुल हा रहदारीसाठी धोकादायक झाला असून या पुलावरून ये-जा करू नये.”

– सरपंच / ग्रामविकास अधिकारी, इंदोरी 

या मजकुरावरून स्पष्ट होते की प्रशासनास पूल धोकादायक असल्याची पूर्वकल्पना होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस अंमलबजावणी किंवा वाहतूक थांबवण्यासाठी उपाययोजना न केल्यानेच ही दुर्घटना घडली, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.  फक्त बोर्ड लावणे पुरेसे नव्हते

या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत:

धोका माहीत असतानाही पुलावरून ये-जा का सुरू ठेवली गेली?

फक्त फलक लावणे म्हणजे जबाबदारी पार पडली असे कसे म्हणता येईल?

प्रशासनाने पुलावर शारीरिक अडथळा किंवा पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही?

दुर्घटना झाल्यावरच कारवाई का केली जाते?

आज अशी स्थिती निर्माण झाली आहे की लक्ष्यवेधी इशारे देऊनही, कृती अभावी दुर्घटना रोखता आली नाही, ही गोष्ट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

आता नेहमी प्रमाणे

दुर्घटनेनंतर संभाव्य मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या घोषणा होईल पण अश्या घटना पुन्हा पुन्हा का घडतात याचे उत्तर फक्त मदतीत नाही, तर उत्तरदायित्वात शोधायला हवे.

एकदा अपघात झाला की 5 ते 10 लाखांची मदत जाहीर करणे हे यंत्रणात्मक अपयशावर मलम लावण्यासारखे आहे. सरकारने आतातरी जागे होऊन धोका माहिती आहे अश्या ठिकाणी दुर्घटना घडण्याअगोदर कारवाई करण्याची गरज आहे

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button