थेरगाव पडवळनगरमध्ये 9 तास वीजपुरवठा खंडित — नागरिक त्रस्त, डासांचा प्रचंड त्रास
थेरगाव पडवळनगरमध्ये 9 तास वीजपुरवठा खंडित — नागरिक त्रस्त, डासांचा प्रचंड त्रास
थेरगाव पडवळनगर, पिंपरी-चिंचवड (11 जून): थेरगाव पडवळनगर परिसरातील नागरिकांना 11 जून रात्री 8 वाजल्यापासून ते 12 जून सकाळी 5 वाजेपर्यंत, तब्बल 9 तास वीज खंडित असल्याचा त्रास सहन करावा लागला. या कालावधीत संपूर्ण परिसर अंधारात होता.
रात्रभर डासांचा प्रचंड त्रास, उकाडा आणि दमट हवामान यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले. झोप न लागल्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांचे विशेष हाल झाले.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन उचलले गेले नाहीत आणि कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही, ही बाब नागरिकांच्या संतापाचे कारण ठरली.
स्थानिक नागरिकांनी वारंवार होणाऱ्या अशा वीज खंडित होण्याच्या घटनांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे 9822548429