Uncategorized

“21 व्या शतकातही सुनेचा छळ आणि बळी – वैष्णवी प्रकरण समाजाला आरसा दाखवतंय”

“21 व्या शतकातही सुनेचा छळ आणि बळी – वैष्णवी प्रकरण समाजाला आरसा दाखवतंय”

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण: ९ महिन्यांच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी कुटुंबीयांची लढाई
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने पुणे आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय आणि सामाजिक खळबळ उडवली आहे. १६ मे २०२५ रोजी भुकूम येथील सासरच्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी हुंडाबळीचा आरोप करत हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

मुख्य आरोपी वैष्णवीच्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर हे सध्या फरार आहेत. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असे समजले जाते.

वैष्णवीच्या वडिलांनी सागितले आहे की, लग्नात ५१ तोळे सोने दिले होते, तरीही सासरच्या मंडळींनी २ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली आणि वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले.

पोस्टमार्टम मध्ये शरीरावर मारहाणीचे जखमा आढळल्या आहेत. वैष्णवीचा मृत्यू ही हत्या आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

याशिवाय, वैष्णवीच्या ९ महिन्यांच्या बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे. त्यांच्यानुसार, बाळाला घेण्यासाठी गेले असता काही लोकांनी त्यांना धमकावले आणि हाकलून दिले. कुटुंबीयांचा दावा आहे की बाळाला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले होत ,शेवटी राजकिय व सामाजिक दबावानंतर बाळाला बाणेर येथे अज्ञात व्यक्तीकडून ताब्यात देण्यात आले
हगवणे याची मोठी सून मयुरी हिला पण असाच छळ करण्यात आलेचे समोर आलं आहे

या प्रकरणात हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि हिंदू महासंघाचे पदाधिकारी उमेश कुलकर्णी, नितीन शुल्क, निखिल गोरडे, आदिती जोशी, उदय कुलकर्णी यांनी आज त्याच्या घरी जाऊन भेट घेतली तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिनिया यांनी फोन वर संपर्क केला असून, त्यांनी कस्पटे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचा आश्वासन दिले आहेत
अशा प्रकरणामुळे असे लक्षात येते की काही राजकीय पदाधिकारी पदाचा गैर वापर करत असून सर्व पक्षांनी पदाधिकारी व सदस्य निवडताना त्यांचे पार्श्वभूमी तपासून पाहणे आवश्यक आहे आणि ज्या पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांची पार्श्वभूमीची गुंड प्रवृत्तीची असेल त्यांना ताबडतोब पक्षातून काढून टाकले पाहिजे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button