महाराष्ट्र ग्रामीण
Supreme Court on ED violating Constitution : ‘ED सर्व मर्यादा ओलांडून संविधान आणि संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे’ सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीच्या कारभारावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे

Supreme Court on ED violating Constitution : सरन्यायाधीस बी. आर. गवई यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, हा गुन्हा महामंडळाविरुद्ध कसा असू शकतो? तुम्ही व्यक्तींविरुद्ध नोंदणी करू शकता.
Supreme Court on ED violating Constitution : ईडीच्या कारभारावरून सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढताना संविधान आणि संघराज्य रचनेचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (22 मे) तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) च्या मुख्यालयावर छापे टाकल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाला (ED) अत्यंत कडक शब्दांमध्ये फटकारले आणि या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय एजन्सीने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती दिली.