Maharashtra

 विश्वजित बारणे यांच्या पुढाकारातून प्रभाग २४ साठी ‘एक कॉल, समस्या सॉल्व्ह’ हेल्पलाईन सुरू

विश्वजित बारणे यांच्या पुढाकारातून प्रभाग २४ साठी ‘एक कॉल, समस्या सॉल्व्ह’ हेल्पलाईन सुरू

पुणे : प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांच्या दैनंदिन समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या संकल्पनेवर आधारित विशेष हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती यांसारख्या नागरी समस्यांवर तत्काळ उपाय मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या हेल्पलाईनवर नागरिकांना फक्त एका फोन कॉलद्वारे आपली तक्रार नोंदवता येणार असून संबंधित यंत्रणेकडून त्वरित कार्यवाही केली जाणार आहे. 8327242424 या क्रमांकावर संपर्क साधून नागरिक विविध अडचणी मांडू शकतात.
या सेवेमध्ये ड्रेनेज व गटर दुरुस्ती, कचरा उचलणे व साफसफाई, रस्ते व फुटपाथ दुरुस्ती, पाणीपुरवठा अडचणी, सार्वजनिक दिवे बंद असणे, सार्वजनिक शौचालयांच्या समस्या तसेच दवाखाने व रुग्णालयांशी संबंधित तक्रारींचा समावेश करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे प्रभागातील नागरिकांना शासकीय यंत्रणेशी थेट संपर्क साधणे सोपे होणार असून तक्रारींचे जलद निवारण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पदाधिकारी विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांनी या हेल्पलाईनचा सक्रियपणे वापर करून आपल्या परिसरातील समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button