वणी शहरात गुरु शिष्य जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन;
वणी शहरात गुरु शिष्य जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन;
नाशिक. ता. वणी :दि. 12 एप्रिल 2026:
वणीत ‘क्रांतीसूर्य’ महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती (द्विशताब्दी जयंती वर्षारंभ) आणि ‘प्रज्ञासूर्य’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीनिमित्त ‘महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समिती’ आणि ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, वणी’ यांच्या वतीने वणी शहरात गुरु शिष्य जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार, ता. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजता जगदंबा देवी चौक, कसबे वणी येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, सरपंच मधुकर भरसट, वणी मर्चेंट बँकेचे चेअरमन महेंद्र बोरा, उपसरपंच विलास कड, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, रविकुमार सोनवणे, भास्कर फुगट, ऍड. शशीकांत क्षिरसागर, मयुर जैन, सतिश जाधव, बाळासाहेब घडवजे, बाळासाहेब गायकवाड, गंगाधर निखाडे, मनोज थोरात, सुनिल तिडके, दिगंबर पाटोळे, नामदेव पैठणे, किशोर बोरा, रितेश पारख, नितीन झोटिंग, प्रकाश ठाकरे, अमोल देशमुख, गणेश कड , अशोक दळवी, सुरज चितोडे, रुद्र चितोड आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळासह गावातील प्रतिष्ठीत उपस्थित होते. यावेळी उभारलेल्या भव्य व्यासपिठावर महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पुजन उपस्थितांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. ‘जय जोती, जय भीम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता..
कार्यक्रमाला संबोधित करताना खासदार भास्कर भगरे यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीच्या कार्याचा गौरव केला. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी फुले-आंबेडकरी विचारांची आज मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, यावेळी प्रमुख उपस्थितानी महात्मा फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त करीत जयंची उत्साहाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप तसेच कर सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल कांचन पवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवरांना जयंती कमिटीच्यावतीने सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन गणेश खरे यांनी तर आभार समता परीषदेचे तालुकाध्यक्ष दुर्गेश चितोड यांनी मानले.
या सोहळ्यासाठी वणी परिसरातील नागरिक, समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.