टाकळीभानचा भूमिपुत्र व्यंकटेश बनकर याने ग्रीको महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मिळवले कांस्यपदक
टाकळीभानचा भूमिपुत्र व्यंकटेश बनकर याने ग्रीको महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये मिळवले कांस्यपदक

टाकळीभान प्रतिनिधी: -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानचा भूमिपुत्र व्यंकटेश दिलीप बनकर याने वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पार पडलेल्या ग्रीको महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा( 87 kg) 2025 – 26 यामध्ये कास्य पदक पटकावले असून स्पर्धेचे आयोजक मा. खा. रामदास तडस व मान्यवरांच्या हस्ते त्यास कांस्यपदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रमध्ये कुस्तीपटूंसाठी प्रतिष्ठेच्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये कुस्तीपटू व्यंकटेश बनकर यांने पटकावलेल्या कांस्यपदकामुळे टाकळीभानची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आपले कौशल्य दाखवत व्यंकटेश याने यश संपादन केले आहे.
शालेय जीवनापासून व्यंकटेश बनकर यास कुस्ती व शरीर सौष्ठव स्पर्धेची आवड होती. त्याप्रमाणे विविध कुस्ती स्पर्धेत सहभाग घेत त्याचे प्रयत्न सुरू होते. आंतरराष्ट्रीय पैलवान शंकर कंधारे यांच्या गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे फाटा, मावळ, पुणे यामध्ये त्याचा सराव सुरू होता. त्याला शिवाजी मोहिते यांनी प्रशिक्षक म्हणून यशस्वीरित्या मार्गदर्शन केले. त्याच्या या यशामध्ये स्वतःची जिद्द, मेहनत व कुटुंबीयांची साथ मोलाची ठरली. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यातील गुण ओळखून त्याला सरावासाठी पुण्याला पाठवले. व ग्रीको महाराष्ट्र केसरी स्पर्धा यामध्ये त्यांने कास्यपदक मिळवत कुटुंबासह गावाचे नाव उज्वल केले. त्याच्या या उज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


