Maharashtra

टाकळीभान येथे साई चरित्र पारायण व श्रीमद देवी भागवत महापुराण सोहळा.

टाकळीभान येथे साई चरित्र पारायण व श्रीमद देवी भागवत महापुराण सोहळा

टाकळीभान प्रतिनिधी:- टाकळीभान येथे श्री. साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित असलेल्या श्री. साईबाबा मंदिरात रविवार दिनांक ५ एप्रिल ते रविवार दिनांक १२ एप्रिल या दरम्यान श्री. साईसच्चरित्र पारायण व श्रीमद देवी भागवत महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवर्य महंत भास्करगिरी महाराज, गुरूवर्य महंत रामगिरी महाराज व स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत असून पारायण सोहळा व्यासपीठ चालक -ह.भ.प. राधेश्याम महाराज पाडांगळे यांचे मार्गदर्शनाखाली ह.भ.प. रविंद्र महाराज गांगुर्डे व ह.भ.प. संदिप महाराज जाधव हे करणार असून श्रीमद् देवी भागवत महापुराण कथा ह.भ.प. स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज (श्री संत बहिरा जातवेद संस्थान, घोगरगांव) दररोज सायं. ६.०० ते ९.०० वाजेच्या दरम्यान कथा करणार आहेत. कथे नंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या निमित्त पहाटे ५ वाजता काकडा आरती, सकाळी ७.०० श्रींची आरती व ग्रंथ पारायण, दुपारी आरती व त्यानंतर महाप्रसाद, सायं. ४ ते ५ हरिपाठ सायं. ६ ते ९ श्रीमद देवी भागवत महापुराण कथा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य पालखी सोहळा शनिवार दि. ११ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजता होणार असून रविवार दि. १२ रोजी सकाळी ९.३० वा. ह. भ. प. स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविक व ग्रामस्थांनी साई चरित्र पारायण व श्रीमद देवी भागवत महापुराण कथा सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. संत साईबाबा प्रतिष्ठाण, साईभक्त मंडळ, किसनगिरी बाबा भक्त मंडळ, रुख्मिनी माता भजनी मंडळ, श्री गुरुदत्त भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button