Maharashtra

श्री भगवंत जन्मोत्सवासाठी भव्य तयारी; नियोजन बैठकीत कार्यक्रमाचा आराखडा निश्चित

श्री भगवंत जन्मोत्सवासाठी भव्य तयारी; नियोजन बैठकीत कार्यक्रमाचा आराखडा निश्चित

पुणे, दि. ५ एप्रिल २०२६ : श्री भगवंत महोत्सव मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री भगवंत जन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनासाठी आज सारसबाग, पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साही वातावरणात पार पडली. मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. अरुण उन्हाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीत दि. २८ एप्रिल २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या श्री भगवंत महोत्सव २०२६ (वर्ष दुसरे) या भव्य सोहळ्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले. भक्तांसाठी आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आकर्षक मेजवानी यावेळी असणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे :
🔹 पहाटे ५.३० ते ६.३० वा. – सौ. शोभा कोल्हे (पुणे) यांचे जन्म कीर्तन
🔹 सकाळी ६.३० वा. – गुलाल व फुलांची उधळण करून प्रकटोत्सव साजरा
🔹 सकाळी ६.३५ ते ९.०० वा. – श्रींच्या पादुकांवर महाअभिषेक
🔹 सकाळी ९.३० ते ११.३० वा. – पादुकांवर तुळशीपत्र व मोगरा पुष्प अर्पण तसेच श्री महाविष्णुयाग
🔹 दुपारी १२.०० वा. – नैवेद्य, महाआरती व महाप्रसाद
(बार्शीकर TV स्टार श्री समिर परांजपे यांच्या हस्ते महाआरती)
🔹 दुपारी ३.३० ते सायं. ६.०० वा. – पुण्यातील कलाकार शुभांगी काळे, देवदत्त मोरे व वेदपाठक यांचा सुगम संगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार असल्याचे अपेक्षित असून, भक्तांना आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळावा यासाठी मंडळाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकीस मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच पुण्यातील बार्शीकर श्री भगवंत भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button