Maharashtra

सांगलीच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवक पदासाठी रुपनर यांच्या नावाची जोरदार चर्चा

सांगलीच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवक पदासाठी रुपनर यांच्या नावाची जोरदार चर्चा ;

सांगली :दि. 12 एप्रिल 2026:
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विनायक रुपनर यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांच्या नावाला कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

मागील महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून लढताना विनायक रुपनर यांनी विरोधकांना कडवी टक्कर दिली होती. अत्यंत कमी मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपली दमदार उपस्थिती दाखवून दिली होती. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात वार्ड क्रमांक 9 मध्ये काँग्रेसचे पॅनल मजबूत करण्यासाठी त्यांना संधी देण्याची मागणी होत आहे.

गेल्या 12 वर्षांपासून विनायक रुपनर हे “दारू नको, दूध प्या” या सामाजिक उपक्रमाद्वारे जनजागृती करत आहेत. संजयनगर परिसरातील अनेक तरुणांना त्यांनी व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणण्याचे काम केले आहे. गांजा आणि इतर नशेच्या पदार्थांच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, कोणत्याही दबावाला न जुमानता समाजहिताचे कार्य सुरू ठेवले आहे.

तसेच माजी मंत्री विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 9 मध्ये काँग्रेस पक्ष नव्या जोमाने उभारी घेत असल्याचे चित्र आहे.

यामुळेच येत्या काळात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी विनायक रुपनर यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button